मासिक पाळी उशिराने येतेय? या 4 पदार्थांचे करा सेवन; Periods येईल नियमित

Irregular Periods : सध्याच्या व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनात आपलं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. यामुळे विशेष करुन महिलांना मासिक पाळी (Menstruation) संदर्भातील समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक तरुणी आणि महिलांमध्ये सध्या अनियमित मासिक पाळीची समस्या पाहायला मिळते. आहारासोबतच मानसिक आरोग्याचाही मासिक पाळीवर परिणाम होत असतो. काही महिलांमध्ये मासिक पाळी 15 दिवस उशिराने येते तर काही माहिलांमध्ये 15-15 दिवसांनी मासिक पाळी येते. तुम्ही तुमच्या आहारवर लक्ष देऊन अशाप्रकारच्या मासिक पाळी संदर्भातील समस्या दूर करु शकता, हे कसं ते जाणून घ्या.

काही खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने अनियमित मासिक पाळीची समस्या दूर करता येते आणि मासिक पाळी नियमित येण्यासही मदत होते. या खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने तुम्हाला दोन ते तीन दिवसात मासिक पाळी येऊ शकते. यामुळे या पदार्थांचे सेवन काळजीपूर्वक करा.

मासिक पाळी सुरू नियमित येण्यासाठी काय खावं?

पपई

मासिक पाळी न येण्याच्या समस्येवर पपई हा रामबाण उपाय मानला जातो. कच्ची पपई खाल्ल्यानंतर पीरियड्स येतात. पपई खाल्ल्यामुळे, गर्भाशयात आकुंचन होऊ लागते, ज्यामुळे मासिक पाळी येते. तुम्ही पपईचा रसही पिऊ शकता.

आलं

आलं औषधी आहे. आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या आल्याचं सेवन केल्याने मासिक पाळी वेळेवर येण्यास मदत होते. आल्याचं सेवन केल्यामुळे गर्भाशयात उष्णता निर्माण होते आणि गर्भाशय आकुंचन होऊन मासिक पाळी येऊ लागते. तुम्ही आल्याचा चहा बनवूनही पिऊ शकता. यासाठी एका ग्लास पाण्यात ताज्या आल्याचे तुकडे टाकून हे पाणी चांगले उकळवा. आता हा चहा गाळून प्या. याशिवाय आल्याचा रस काढून त्यात थोडे पाणी मिसळूनही तुम्ही पिऊ शकता. तुम्ही आल्याच्या रसात मध मिसळूनही पिऊ शकता. यामुळे मासिक पाळी येण्यास मदत होईल.

गूळ आणि ओवा

मासिक पाळी नियमितपणे येत नसल्यास गूळ आणि ओव्याचे सेवन परिणामकारक ठरेल. एक ग्लास पाण्यात एक चमचा गूळ किंवा गूळ पावडर आणि एक चमचा ओवा टाका. हे पाणी चांगले उकळून आणि गाळून घ्या. हा चहा एक-दोन दिवस सकाळी प्या. मासिक पाळी येईल.

धणे

अनियमित मासिक पाळीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी धण्याचे सेवन करा. दोन कप पाण्यात एक चमचा धणे घालून उकळवा. जेव्हा हे पाणी उकळून अर्धे कमी होईल, तेव्हा ते कपमध्ये घेऊन चहाप्रमाणे प्या. असं दिवसातून 2 ते 3 वेळा प्या. यामुळे मासिक पाळी नियमित होण्यास मदत होईल.

Check out below Health Tools-

Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator