Health : सारखं मॉइश्चरायझर लावणं पडू शकतं महागात! आरोग्यासाठी ठरतं हानिकारक, जाणून घ्या

Health : काही जण तोंडाला, हाताला, पायाला सारखे मॉइश्चरायझर लावत असतात. त्यांना कोणत्याही ऋतुत सारखं मॉइश्चरायझर लावण्याची सवय असते. त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि आर्द्रता राखण्यासाठी आपण मॉइश्चरायझरचा वापर नक्कीच करतो. हा एक त्वचेच्या काळजीचा एक महत्त्वाचा भाग असून, जर तुम्ही त्याचा अतिवापर करत असाल तर सावधान, कारण तुमच्या त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. जास्त मॉइश्चरायझर लावल्याने काय तोटे होऊ शकतात? जाणून घेऊया.

मॉइश्चरायझरचा अतिवापर करत असाल तर सावधान!

हिवाळा असो किंवा उन्हाळा, प्रत्येक ऋतूत आपल्या चेहऱ्याचा ओलावा टिकवण्यासाठी आपण मॉइश्चरायझर वापरतो. पण या मॉइश्चरायझरच्या अतिवापरामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. जास्त मॉइश्चरायझर वापरल्याने त्वचेची छिद्र बंद होतात, ज्यामुळे मुरुम आणि फोड्या येऊ शकतात, तसेच त्वचा खूप कोरडी किंवा तेलकट होऊ शकते. यामुळे त्वचेची जळजळ किंवा ऍलर्जी देखील होऊ शकते. याशिवाय त्वचेच्या रंगावरही परिणाम होऊ शकतो आणि त्यावर धूळ सहज चिकटते. या सर्व समस्या टाळण्यासाठी आपल्या त्वचेसाठी एखादे योग्य मॉइश्चरायझर निवडले पाहिजे, तसेच ते योग्य प्रमाणात वापरले पाहिजे. या लेखात आपण जास्त मॉइश्चरायझर लावल्याने होणारे नुकसान समजून घेण्याचा प्रयत्न करू. जाणून घेऊ सविस्तर

चेहरा तेलकट दिसू लागतो

जास्त मॉइश्चरायझर वापरल्याने चेहरा चिकट होतो, जो केवळ विचित्रच दिसत नाही तर तुम्हाला अस्वस्थही वाटतो. चेहऱ्याचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी याचा दररोज वापर केला तर त्यावर मेकअप लावणे कठीण होते.

छिद्र बंद होऊ लागतात

मॉइश्चरायझरच्या जास्त वापरामुळे त्वचेची छिद्रे बंद होतात, ज्यामुळे मुरुम आणि फोड्यांचा धोका वाढतो. यामुळे त्वचा अधिक तेलकट होऊ शकते. तसेच ओव्हर मॉइश्चरायझिंगमुळे चेहऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य हळूहळू नष्ट होऊ लागते. यासोबतच त्याचा जास्त वापर केल्याने केवळ चेहऱ्याच्या त्वचेवरच नाही तर संपूर्ण शरीरावर मुरुमांची समस्या उद्भवते.

त्वचा खराब होऊ लागते

आपल्या त्वचेची नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आपण वापरत असलेले मॉइश्चरायझर जर जास्त प्रमाणात वापरले तर ते आपल्या त्वचेला अनेक प्रकारे नुकसान करू लागते. यामध्ये नको असलेल्या बारीक रेषा, लालसरपणा, राखटपणा यासारख्या समस्या उद्भवू लागतात. याचा आपल्या त्वचेच्या आरोग्यावर परिणाम होतो, ज्यामुळे आपली त्वचा निर्जीव दिसू लागते.

हेही वाचा>>>

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-

Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator